2026 Horoscope: ज्योतिषानुसार २०२६ वर्ष ग्रहांच्या हालचालींसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षी अनेक ग्रह आपली राशी बदलतील, तर काही ग्रह वक्री आणि मार्गी होतील. वर्षाच्या सुरुवातीला दोन मित्र ग्रह म्हणजे कर्मफळ देणारा शनी आणि वैभव देणारा शुक्र हे दोघे मीन राशीत एकत्र येणार आहेत.

ज्योतिषानुसार शनी आणि शुक्र हे एकमेकांचे मित्र ग्रह असल्याने या दोघांची युती काही राशींसाठी शुभ ठरू शकते. २०२६ च्या सुरुवातीला या राशींना अचानक धनलाभ, प्रगती आणि चांगले दिवस मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी शनी आणि शुक्राची युती अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीत उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कमाईचे नवे-नवे मार्ग मिळू शकतात. गुंतवणुकीतूनही फायदा होईल. व्यापाऱ्यांना अचानक मोठा नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. तसेच वाहन खरेदी करण्याचा किंवा नवीन घर घेण्याचा तुमचा स्वप्नही पूर्ण होऊ शकतो.

कर्क राशी (Cancer Horoscope)

शनी आणि शुक्राचा संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीपासून नवव्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे भाग्योदय होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या नेतृत्वगुणांमध्ये सुधारणा होईल. नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल. हा काळ तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास आणेल. घरात सुख-शांती राहील. तसेच तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता आणि देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते.

मीन राशी (Pisces Horoscope)

तुमच्यासाठी शनी आणि शुक्राची युती सकारात्मक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीपासून लग्न भावात होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात वाढ होईल आणि नवे व्यावसायिक संबंध तयार होतील. विवाहित लोकांचे दांपत्य जीवन आनंदी राहील. पार्टनरशिपमधील कामांमधूनही फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तसेच बराच काळ थांबलेली कामे किंवा योजना या काळात पुन्हा सुरू होतील आणि प्रगती होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)