24th April Panchang & Marathi Horoscope: २४ एप्रिलला चैत्र कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. बुधवारचा आजचा पूर्ण दिवस व रात्र ते गुरुवार सकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत प्रतिपदा तिथी कायम असणार आहे. तसेच गुरुवारी सकाळी ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत सिद्धी योग कायम असणार आहे. बुधवारी रात्री १२ वाजून ४१ मिनिटांपर्यत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. आज रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी शुक्र मेष राशीत गोचर करणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे पाहूया.

२४ एप्रिल २०२४ पंचांग व राशी भविष्य

मेष:-मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल.

वृषभ:-इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा.

मिथुन:-लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे.

कर्क:-जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.

सिंह:-उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा.

कन्या:-आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल.

तूळ:-मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही.

वृश्चिक:-उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. चार चौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू:-कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर:-अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल.

कुंभ:-अती विचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा.

हे ही वाचा<< १ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

मीन:-आपले मत ठामपणे मांडाल. कामात प्रगतीला वाव आहे. जमिनीच्या कामातून चांगला फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर