Budhaditya Rajyog In Kumbh Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपल्या मित्र व शत्रू ग्रहांसह युती साधून विविध योग निर्माण करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवन व संपूर्ण पृथ्वीतलावर दिसून येत असतो. मकरसंक्रांती नंतर आता लवकरच शनीच्या राशीत बुध व सूर्याची युती होणार आहे. बुध व सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून बुधादित्य राजयोग निर्माण होत असतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधादित्य राजयोग सक्रिय असतो त्यांच्या व्यक्तिमत्वाला व बुद्धीला सूर्याची झळाळी मिळू शकते, असे मानले जातात. सूर्य व बुधाचा संगम हा मित्र ग्रहांचा असल्याने दोघांची शक्ती एकत्रित येऊन प्रभावित राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणू शकते. या राशींचा सर्वतोपरी विकास होऊन धन- धान्य प्राप्त होऊन, प्रगती होऊन लाडू- पेढे वाटण्याची संधी मिळू शकते. या प्रभावित राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात लाभ होऊ शकतो हे पाहूया..

बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील धनवान

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

मुळात कुंभ राशीतच बुधादित्य राजयोग बनल्याने त्याचा प्रथम प्रभाव तुम्हाला अनुभवता येईल. यामुळे आपला मान सन्मान वाढू शकतो. शनी, बुध आणि सूर्याची चांगली साथ मिळाल्याने हाती घेतलेल्या कामांना योग्य गती मिळेल. मेहनतीचे चांगले फळ मिळाल्याने उत्साह वाढेल.. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरूच ठेवावेत, यश मिळेल. कौटुंबिक समस्या सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

सूर्य आणि बुध ग्रहांचे पाठबळ खूप महत्त्वाचे ठरेल. योजलेली कामे पूर्ण कराल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवे संकल्प अमलात आणाल. एकाग्रता फारच महत्वाची ठरेल. नोकरी व्यवसायातील कामाचा वेग वाढेल, नव्या संधी उपलब्ध होतील. खात्रीपूर्वक मार्गाने पुढे गेलात तर यश आपलेच आहे. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहित मंडळींना वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक खूप लाभदायक ठरेल.

हे ही वाचा<< १६ जानेवारी पंचांग: किंक्रांतीच्या दिवशी ‘या’ लोकांना नव्या नोकरीची संधी, सुखाने भरेल झोळी! वाचा तुमच्या राशीचं आजचं भविष्य 

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

आपल्या प्रभावी बोलण्याने इतरांवर छाप पाडाल. कामातील नेमकेपणा, मुद्देसूद भाषण यामुळे प्रगतिकारक घटना घडतील. पदोन्नतीसह पगारवाढीची संधी आहे. विद्यार्थी वर्गाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरी व्यवसायात अधिकारपद भूषवाल. विवाहोत्सुक मंडळींना वधुवर संशोधनात यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांना वैवाहीक सुख चांगले मिळेल. घर, प्रॉपर्टी, जमीनजुमला याबाबतचे कामकाज कायदेशीर मार्गाने पुढच्या टप्प्यावर जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)