Today Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. तर महादेवाच्या कृपेने आज १२ राशींचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊया…

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 04 August 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ०४ एप्रिल २०२५

18:36 (IST) 4 Aug 2025

५ ऑगस्टला 'या' ४ राशींच्या नशिबी अफाट संपत्ती! भगवान विष्णूच्या कृपेने अचानक धन लाभ, पुत्रदा एकादशी ठरेल तुमच्यासाठी शुभ

Putrada Ekadashi: यंदा पुत्रदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग बनत आहेत, जे ४ राशींसाठी खूपच शुभ ठरू शकतात. ...वाचा सविस्तर
14:20 (IST) 4 Aug 2025

Weekly Numerology Predictions : मूलांक २ असलेल्यांना मिळेल आनंदाची बातमी! अचानक मिळेल पैसाच पैसा, वाचा तुमचे साप्ताहिक अंक राशीभविष्य

मूलांक १ ते मूलांक ९च्या लोकांना हा आठवडा कसा जाईल ते जाणून घेऊया. साप्ताहिक अंक राशीभविष्य जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
14:14 (IST) 4 Aug 2025

Weekly Horoscope : या आठवड्यात या ५ राशींच्या चमकतील नशिबाचे तारे! मिळेल आनंदाची बातमी, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या… ...अधिक वाचा
14:14 (IST) 4 Aug 2025

या मूलांकच्या मूलींवर असते कुबेर देवाची कृपा! लग्नानंतर नवऱ्याच्या आयुष्यात होतो धनवर्षाव!

अंकज्योतिषानुसार मूलांक १, ४ आणि ८ असलेल्या मुली लग्नानंतर नवऱ्याला श्रीमंत बनवतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि ग्रहांची कृपा आर्थिक स्थैर्य देतात. ...सविस्तर बातमी
13:20 (IST) 4 Aug 2025

तब्बल २७ वर्षानंतर 'या' ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश

Shani Nakshatra Parivartan: शनी देव उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहेत आणि ऑक्टोबर महिन्यात ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. या राशींना भरपूर पैसा, पद आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी लकी आहेत… ...वाचा सविस्तर
13:04 (IST) 4 Aug 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope 4 August)

जोडीदाराच्या सहवासात रमाल. मनातील गैरसमज दूर होतील. आवडता छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. अति शिस्तीचा बडगा करू नका.

12:22 (IST) 4 Aug 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope 4 August)

सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत. मेहनतीला पर्याय नाही.

11:55 (IST) 4 Aug 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope 4 August)

कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. कामाचा ताण जाणवू शकतो.

11:41 (IST) 4 Aug 2025

आजचे धनु राशिभविष्य (Sagittarius Horoscope 4 August)

घरगुती वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

11:02 (IST) 4 Aug 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope 4 August)

नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. भावनिक घटना घडू शकतात.

10:59 (IST) 4 Aug 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope 4 August)

अचानक धनलाभ संभवतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.

10:34 (IST) 4 Aug 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope 4 August)

सामाजिक बांधीलकी जपा. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन अनुभावातून शिकाल.

10:19 (IST) 4 Aug 2025

'या' ३ राशींचे लोक असतात खूप रोमँटिक! जोडीदारावर करतात भरपूर प्रेम, आयुष्यभर देतात साथ...

Love Astrology: हे लोक प्रेमात खूप भावुक असतात, शुद्ध आणि दीर्घकाळ टिकणारं नातं टिकवतात, पार्टनरची काळजी घेतात. ...अधिक वाचा
10:08 (IST) 4 Aug 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope 4 August)

खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल.

09:50 (IST) 4 Aug 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope 4 August)

प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी.

09:27 (IST) 4 Aug 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope 4 August)

अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल. आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे.

09:18 (IST) 4 Aug 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope 4 August)

मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही. विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल.

08:54 (IST) 4 Aug 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope 4 August)

अविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. काही बदल त्रस्त करू शकतात. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील.

08:39 (IST) 4 Aug 2025

Today Horoscope 4 August: श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी अचानक धनलाभ! महादेवाच्या कृपेने 'या' राशींना मिळेल मेहनतीचे फळ, वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य

4 August Horoscope: आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सोमवारी १२ राशींवर महादेव कशाप्रकारे करणार कृपा... ...सविस्तर वाचा

Horoscope Today in Marathi 4 August 2025

Today Horoscope 4 August 2025 (Photo Courtesy- Freepik)