6 April 2024 Panchang & Rashi Bhavishya: ६ एप्रिल २०२४ ला फाल्गुन शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. या दिवशी शनीचे शतभिषा नक्षत्र जागृत असेल तसेच आजच्या दिवशी शनी प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ असून सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. राहू काळ हा सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी चंद्रमा कुंभेत स्थित असणार आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल याचा हा आढावा पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनी प्रदोष व्रत दिन: मेष ते मीन राशी भविष्य

मेष:-कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा. आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात.

वृषभ:-स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन:-छोट्याश्या सुखाने सुद्धा खुश व्हाल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.

कर्क:-मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह:-कलाकारांना अनुकूलता लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कमिशनकडे लक्ष ठेवावे लागेल.

कन्या:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. अनुभवाचा वापर करता येईल. योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:-प्रवास सावधगिरीने करावा. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.

वृश्चिक:-वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत कराल. कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

धनू:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.

मकर:-दिवसभर कामात गढून जाल. आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे.

कुंभ:-नसती काळजी करू नये. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. घरात टापटीप ठेवाल.

हे ही वाचा<< ५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

मीन:-जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष घालावे. घरगुती कामे उत्तमरीत्या पार पाडाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6th april panchang rashi bhavishya shani pradosh vrat shatbhisha nakshtra active 46 minutes abhijaat muhurta mesh to meen money horoscope svs
First published on: 05-04-2024 at 19:07 IST