Horoscope Today In Marathi, 4 June 2025 : ४ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत वज्र योग जुळून येईल, त्यानंतर सिद्धी योग जुळून येईल. रात्री ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १२:३० वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आज बुधवार तुमच्या राशीत काय घेऊन आला आहे जाणून घेऊया…

४ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Daily Horoscope In Marathi , 4 June 2025 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi )

कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi )

कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)

जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.

दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope In Marathi)

अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.

दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope In Marathi)

सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope In Marathi)

जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका.

दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope In Marathi)

स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope In Marathi)

वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांति जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.

दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope In Marathi)

भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope In Marathi)

काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope In Marathi)

क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.

दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope In Marathi)

बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर