Rashi Bhavishya In Marathi 20 October 2025 : आज २० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. आज इंद्र योग जुळून येईल आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत सुरु होईल ते ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. दिवाळीची पहिली अंघोळ आणि कारीट फोडण्याचा विधी या दिवशी करतात. तर दिवाळी पहाट तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊयात…
२० ऑक्टोबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi 20 October 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
घरातील कामात व्यस्त राहाल. जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाला पर्याय नाही.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील. हातातील वेळेचा सदुपयोग करा. व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
काटकसरीवर लक्ष द्या. हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्यांचे मत ग्राह्य मानावे लागेल. कार्यालयीन सहकार्यांची मदत मोलाची ठरेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये. कुटुंबातील सदस्यांबरोबर विचार विनिमय करावा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक दाखवाल. विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
एकांतात काही काळ घालवावा. काही गोष्टींचे मनन चिंतन करावे. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. झोपेची तक्रार जाणवेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
जुने ग्रंथ वाचनात येतील. आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल. तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल. मदतीचा आनंद मिळवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
व्यापार्यांना नवीन दिशा सापडेल. मनातील साशंकता काढून टाका. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
मुलांशी वाद संभवतात. जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका. भागीदारीत फार विसंबून राहू नका. उगाचच चीड -चीड करू नये.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर