Ahoi Ashtami Lucky Zodiac Signs : हिंदू धार्मिक मान्यतांमध्ये अहोई अष्टमीला विशेष महत्त्व आहे. कॅलेंडरनुसार हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येतो. यावेळी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अहोई अष्टमी साजरी केली जाईल. अहोई अष्टमी १३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ०९ मिनिटांनी समाप्त होईल.
या दिवशी महिला निर्जला व्रत करतात आणि अहोई देवीची मनापासून पूजा करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, हे व्रत पाळल्याने मुलांचे आयुष्य वाढते, जीवनात समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी अहोई अष्टमी काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. अहोई देवीच्या आशीर्वादाने, या राशींचे भाग्य चमकू शकते, रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असेल. तर, चला जाणून घेऊया नक्की कोणत्या राशींचे लोक भाग्यवान आहेत…
वृषभ राशी – ही अहोई अष्टमी वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. अहोई देवीच्या आशीर्वादाने, दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मुलाकडून मिळालेली एखादी महत्त्वाची कामगिरी मनाला आनंद देऊन जाईल. कुटुंबात तुमचा आदर वाढेल. आर्थिक लाभ, नवीन संधी आणि जीवनात एक सकारात्मक नवीन सुरुवात होईल.
कर्क राशी – अहोई अष्टमीला कन्या राशीच्या लोकांना चंद्राचे विशेष आशीर्वाद मिळतील. हा काळ मानसिक शांती, संतती सुख व कुटुंबाच्या वाढीशी संबंधित असेल. आई-बाबा होण्याची वाट पाहणाऱ्या जोडप्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. अहोई देवीची पूजा केल्याने तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळू शकतात. हा काळ कुटुंबात आनंद वाढवणाराच नाही, तर पती-पत्नीमधील नात्यात गोडवा आणणाराही असेल.