Shani Dev Vakri Impact in Marathi: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि महारांजांचे राशीपरिवर्तन मीन राशीत झाले. मीन राशीत आल्यानंतर शनी आता या राशीतच वक्री होण्यास तयार आहेत. शनि वक्री अवस्थेत असणे म्हणजे शनि ग्रह या काळात उलट दिशेने चाल करत राहतो. पंचांगानुसार, रविवार, १३ जुलै रोजी सकाळी ९:३६ वाजता शनि वक्री होईल. तर २८ नोव्हेंबर रोजी, शुक्रवारी सकाळी ९:२० मिनिटांनी, शनि सरळ म्हणजेच मार्गी होईल. त्यामुळे शनीच्या कृपेने मोठ्या अवधीसाठी काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो. या राशींना एकाअर्थी कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकते असेही म्हणता येईल. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ते पाहूया…
पुढचे ४ महिने ‘या’ राशींच्या लोकांवर शनिदेवाची कृपा!
वृषभ
शनीची वक्री स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरु शकते. आगामी काळ फायदेशीर, लाभदायी ठरू शकतो. जर गुंतवणूक करणार असाल तर या काळात नफा मिळू शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि व्यवसायात पैसे गुंतवल्याने दुप्पट नफा होऊ शकतो. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व वाद दूर होऊ शकतात.
कर्क
शनि वक्री स्थितीत येताच कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल. व्यवसायात नफा होऊ शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. घरात सुख आणि शांती राहील.
धनू
शनीची वक्री स्थिती धनू राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारी ठरु शकते. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहू शकतो. नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. करिअरमध्ये चांगले बदल दिसून येऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात. जमीन, मालमत्ता, वाहन इत्यादी खरेदी करण्याची शक्यता देखील असू शकते. लग्नातील अडथळे दूर होऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)