Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह जवळपास १३ महिन्यानंतर गोचर करणार आहे. आता गुरू ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
गुरू ऑक्टोबर महिन्यात अतिचारी गतीने कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस येऊ शकतात. तसेच या लोकांच्या पगारात वृद्धी होऊ शकते. पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊ या, त्या राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते. कारण गुरू या राशीच्या चतुर्थ स्थानावर आहे. त्यामुळे यादरम्यान या लोकांना सुख सुविधा मिळू शकते. तसेच या दरम्यान या लोकांची समाजात मान प्रतिष्ठा वाढणार आणि यांची प्रतिभा सकारात्मक होईल. या दरम्यान हे लोक वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. तसेच कुटुंबात सुख शांती दिसून येईल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेन. आईवडीलांबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण दिसेल. विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हीटीला प्रोत्साहन मिळेल. कलेशी संबंधिक लोकांच्या कमाईत वाढ होईल
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
गुरुचे गोचर या लोकांसाठी शुभ फळ देणारे ठरू शकतात. कारण गुरूचे गोचर या राशीच्या भाग्य स्थानावर होईल. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो. तसेच काम आणि व्यवसायाशी संबंधित हे लोक प्रवास करू शकतात. या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या लोकांना क्रिएटिव्ह आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यश मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायात नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वात उत्तम आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
कर्क राशी (Cancer Zodiac)
गुरू बृहस्पतीचे राशी परिवर्तन या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण गुरूचे या राशीमध्ये लग्न स्थानावर गोचर करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात या लोकांचे वैवाहिक आयुष्य सुखमय होईल. तसेच पार्टनरची प्रगती होऊ शकते. तसेच या दरम्यान अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेत व्यवसायात संधीद्वारे या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते. लोक यांच्याकडे आकर्षित होतील. अशात हे लोक त्यांच्या स्वभावात सकारात्मक परिवर्तन बघतील. तसेच या लोकांना पार्टनरशिपच्या कामात लाभ मिळेन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)