Mesh To Meen Horoscope In Marathi : १७ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत राहील. शूल योग रात्री ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे.

त्याचप्रमाणे आज औदुंबर पंचमी साजरी केली जाणार आहे. माघ कृष्ण पंचमी तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. तर मेष ते मीन राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार हे आपण जाणून घेऊया…

१७ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.

वृषभ:- काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चंचलता जाणवेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील.

मिथुन:- रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका.

कर्क:- दिवसभर कामात व्यग्र राहाल. पित्त विकार बळावू शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात.

सिंह:- जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका.

कन्या:- वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

तूळ:- परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत.

वृश्चिक:- बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा.

धनू:- लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल.

मकर:- सामुदायिक वादापासून दूर राहावे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान-धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी . शांततेचा मार्ग स्वीकारावा.

कुंभ:- वेळेचे बंधन पळावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.

मीन:- कौटुंबिक सौख्यात भर पडेल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर