August Horoscope: वैदिक पंचांगानुसार, ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येईल. या महिन्यात बुध आणि शुक्र युतीमुळे लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होईल आणि गुरु-शुक्र युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग बनेल. सूर्य देवही आपल्या सिंह स्वराशीत प्रवेश करतील.
११ ऑगस्टला बुध ग्रह मार्गी होतील आणि २१ ऑगस्टला शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करतील. तसेच ३१ ऑगस्टला बुध ग्रह सिंह राशीत जातील. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळणार आहे. या राशींना अचानक पैसा मिळू शकतो आणि भाग्य उघडण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळण्याची संधी आहे. चला पाहूया, ऑगस्ट महिन्यात कोणत्या राशींना ग्रहांच्या भ्रमणाचा फायदा होणार आहे…
मकर राशी (Capricorn Zodiac Sign Horoscope)
तुमच्यासाठी ३ ग्रहांच्या हालचालीत होणारा बदल फायद्याचा ठरू शकतो. कारण शुक्राची सप्तम दृष्टि असल्यामुळे कर्क राशीत तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण राजयोगाचा लाभ तुम्हाला मिळेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ आणि बढतीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन पार्टनरसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
धनु राशी (Sagittarius Zodiac Sign Horoscope)
तीन ग्रहांच्या हालचालीत होणारा बदल मकर राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरू शकतो. कारण गुरु आणि शुक्र यांची सप्तम दृष्टि धनु राशीवर पडेल. त्यामुळे धनु राशीच्या लोकांना धन-संपत्तीचा आनंद मिळेल आणि करिअरमध्ये अधिकारी तुमच्या कामाने खुश होतील. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळू शकते. तसेच, या काळात जीवनसाथीला प्रगती होण्याची शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer Zodiac Sign Horoscope)
तुमच्यासाठी ३ ग्रहांच्या हालचालीत होणारा बदल फायद्याचा ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतच लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटवाल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पार्टनरसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल. या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि बढतीची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक आयुष्यात आनंदी अनुभव येतील आणि जोडीदारासोबत नात्यात गोडवा वाढेल.