Baba Vanga Predictions 2026: महाराष्ट्रासह भारतात पावसाने मोगलाई माजवली आहे. अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. तर काही देशांमध्ये भूंकपाचे हादरे बसले आहेत. भविष्यवेत्ती बाबा वेंगांनी तर पुढील वर्षांसाठी अजून खतरनाक भविष्यवाणी केली आहे. बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला होता. बाबा वेंगा यांनी वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टी गमावल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे ज्योतिषीय क्षमता असल्याचा दावा केला होता. बाबा वेंगा आता त्यांच्या भाकितासाठी, विशेषतः ९/११ च्या हल्ल्यांबद्दल, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चीनच्या विस्ताराबद्दल, जगभरात प्रसिद्ध आहेत आणि ही भाकिते भूतकाळात खरी ठरली होती, ज्यामुळे सर्व लोकांना त्यांच्या भाकितांवर विश्वास आहे.
बाबा वेंगा ज्यांच्या भयानक आणि रहस्यमय भविष्यवाण्या जागतिक चर्चेचा विषय बनल्या आहेत, ती भयानक आणि रोमांचक आहे.१९९६ मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी, त्यांनी ५०७९ पर्यंत भाकिते केली होती.बाबा वेंगाची भाकितं नैसर्गिक आपत्तींपासून ते तिसरे महायुद्ध, मानवी अधोगती आणि बहुआयामी तांत्रिक प्रगतीपर्यंत आहेत. सोशल मीडियावरील अनेक लोक आता २०२६ साठी बाबा वांगाच्या भाकितं जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.२०२६ सालासाठी त्यांनी कोणती भविष्यवाणी केली आहे ते जाणून घेऊयात.
बाबा वेंगाच्या भाकितांनुसार, २०२६ ते २०२८ या काळात भूकबळीची समस्या दूर होईल. जगभरात अन्नधान्याचा मोठा साठा असेल. शेजारील चीन आर्थिक आणि सैन्य शक्तीत अमेरिकेवर वरचढ ठरेल. विज्ञान आणि संशोधनात मानव मोठा पल्ला गाठेल. याशिवाय येत्या काही वर्षात तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. बाबा वेंगाच्या ज्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या त्यात अणु पाणबुडी कुर्स्क आपत्ती, आयसिस दहशतवादी संघटनेचा उदय, सीरियन गॅस हल्ला, ब्रेक्झिट, ९/११ दहशतवादी हल्ले आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू यांचा समावेश आहे.बाबा वांगाच्या भारतासाठीच्या भाकित्यांमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे.
भारतासाठी काय भविष्यवाणी
भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांनी भारतासाठी संकटांची मालिका वाचली आहे. नैसर्गिक आपत्ती या काळात भारतावर येईल असे भाकीत वर्तवले आहे.भारतात तीव्र पूर, भूस्खलन आणि विक्रमी तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. वांगाच्या मते, अनेक शहरांना पाण्याची टंचाई भासेल.ज्याचा परिणाम भारतीय राजकारणावर दिसून येईल.शास्त्रज्ञ बाबा वांगाच्या भविष्यवाण्या पूर्णपणे नाकारतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: पहिले, वांगाच्या भविष्यवाण्यांची कोणतीही लिखित नोंद नाही.