Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सुर्य ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो. सूर्याच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार ७ नोव्हेंबरला म्हणजेच आज पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुर्याचा विशाखा नक्षत्रात प्रवेश केला आहे. तो या नक्षत्रात १७ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २७ नक्षत्रांपैकी विशाखा नक्षत्र हे १६ वे नक्षत्र मानले जाते. ज्याचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे या नक्षत्र परिवर्नामुळे काही राशीच्या लोकांना दिवाळीपर्यंत विशेष लाभ मिळू शकतो. विशाखा नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे काही राशींना धनाची प्राप्ती होऊ शकते. तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांच्या राशीच्या दहाव्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकतात तसेच पैशाची बचतही करू शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, तसेच कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रमोशन होऊ शकते. व्यावसायिकांना मोठ्या यशासह आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या विरोधकांचा पराभव करु शकता, तसेच तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहू शकते.

धनु रास

सुर्याचा नक्षत्र बदल गुरुची राशी धनुसाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य तुमच्या राशीच्या नवव्या स्थानाचा स्वामी आहे. याचा तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो. नोकरी-व्यवसायात अपार यशासह संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नवीन गोष्टी शिकू शकता. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाऊ शकतो. अविवाहितांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

हेही वाचा- ५९ वर्षांनंतर धनत्रयोदशीला बनतोय दुर्मिळ योग; ‘या’ राशींचे नशीब पालटणार? लक्ष्मी कृपेने अपार धनलाभाची शक्यता

कुंभ रास

विशाखा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या सातव्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. नवीन कामात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. नोकरदारांना लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह सहलीला जाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)