Bhadra And Malavya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका निश्चित काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करून शुभ योग आणि राजयोगाची निर्मिती करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर दिसून येतो. यात जूनमध्ये दोन महापुरुष राजयोग निर्माण होत आहेत, ज्यात शुक्र ग्रह त्याच्या स्वराशीत म्हणजे वृषभ राशीत भ्रमण करेल आणि मालव्य राजयोग निर्माण करेल; तर बुध ग्रह त्याच्या स्वराशीत मिथुन राशीत भ्रमण करेल आणि भद्र राजयोग निर्माण करेल. अशाप्रकारे १०० वर्षांनंतर एकत्र भद्र आणि मालव्य राजयोग निर्माण होणार आहेत, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. पण, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत जाणून घेऊ…

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी भद्रा आणि मालव्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात मिथुन राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. संवाद कौशल्य सुधारू शकते, ज्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. या काळात पैसे कमावण्यासह तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल. या काळात तुम्हाला पैशांची बचत करण्यात यश येईल.

तुळ

भद्र आणि मालव्य राजयोगाची निर्मिती तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात यश मिळेल, उत्पन्न वाढू शकेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला देशात आणि परदेशात प्रवास करण्याची संधीदेखील मिळू शकते. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात भाग घेऊ शकता. या काळात तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल. तसेच, यावेळी तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते.

मीन

मालव्य आणि भद्र राजयोगाची निर्मिती मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदू शकते. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो, यासह सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीत तुमच्या आई आणि सासू-सासऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल.