Super Moon on Guru Purnima 2022 : यंदा १३ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना या वर्षी आकाशात रात्रीच्या वेळी एक विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. खरं तर यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा आकाराने मोठा दिसेल. याला सुपरमून म्हटलं जातं. यंदाच्या सुपरमून २०२२ चं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सुपरमून ठरणार आहे.

जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा एक सुपरमून दिसतो. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जगाला एक अनोखा चंद्र दिसणार आहे. या दिवशी चंद्र इतर दिवसांपेक्षा खूप मोठा, तेजस्वी आणि गुलाबी असेल.

१३ जुलैची रात्र तुमच्यासाठी आश्चर्यकारक दृश्ये घेऊन येणार आहे. या दिवशी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल. आज रात्री चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ ३५७,२६४ किलोमीटर असेल. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सुपरमून काही महासागराच्या ठिकाणी वादळ देखील आणू शकतो. सुपरमून १३ जुलैच्या रात्री १२.०७ वाजता दिसण्याची शक्यता आहे, तर पुढच्या वर्षी २०२३ मध्ये ३ जुलै रोजी तो दिसेल.

आणखी वाचा : २४ तासानंतर शनिदेवाचा प्रिय राशीत प्रवेश, या ३ राशींना अचानक होणार आर्थिक लाभ

सुपरमून म्हणजे काय?
सुपरमून म्हणजे या काळात चंद्र त्याच्या आकारापेक्षा मोठा दिसतो. इतकेच नाही तर या रात्री चंद्र प्रत्येक दिवसापेक्षा अधिक तेजस्वी दिसतो. कारण या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर खूपच कमी होते आणि चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो.

या वर्षी २०२२ मध्ये किती पौर्णिमा दिसणार आहेत?
वर्षाच्या १२ महिन्यांत, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण आकारात असतो, म्हणून त्याला पौर्णिमा म्हणतात. २०२२ मध्ये मलमास नाही. त्यामुळे १२ पौर्णिमा आहेत. त्यापैकी स्ट्रॉबेरी फुलमून जून महिन्यात दिसला आणि सर्वात मोठा सुपरमून जुलैमध्ये गुरु पौर्णिमेला आज दिसेल.

आणखी वाचा : आता आयुष्याची अजून किती वर्षे उरली आहेत? अशा प्रकारे जाणून घ्या

भारताशिवाय इतर देशांमध्येही पौर्णिमेला वेगवेगळी नावे
भारताव्यतिरिक्त जगातील विविध देशांमध्ये पौर्णिमा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. जपानमध्ये पौर्णिमेला त्सुकुमी म्हणतात, कोरियामध्ये चुसेओक म्हणतात. श्रीलंकेत पौर्णिमेला पोया म्हणून ओळखले जाते. यासोबतच इथल्या प्रत्येक पौर्णिमेला वेगळे नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लू मून कधी दिसतो?
सुपरमूनप्रमाणे जेव्हा एका वर्षात लीप वर्ष असते, म्हणजे फेब्रुवारी २९ दिवसांचा असतो, तेव्हा १२ ऐवजी १३ पौर्णिमेच्या तारखा असतात. यंदाची पौर्णिमा ब्लू मून म्हणून ओळखली जाते. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला साधारणपणे २९.५ दिवस लागतात. याला चंद्र महिना म्हणतात. या काळात एका वर्षात १२ पौर्णिमा दिसतात.