Lord Shiva Favourite Mulank: ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज राशीवरून लावता येतो, त्याचप्रमाणे संख्याशास्त्रातही संख्यांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. आपली जन्मतारीख केवळ एक आकडा नसतो, तर ती आपल्या आयुष्याची दिशा आणि नशीब ठरवते, असं अंकज्योतिषशास्त्र सांगतं. मूलांक एक अंक असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेतून मिळणारा अंक, त्या व्यक्तीच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा करतो. एकंदरीत, हा अंक त्या व्यक्तीच्या जीवनाच्या संबंधित असतो. १ ते ९ या अंकांचे संबंधित ग्रह आणि देव असतात आणि काही निवडक अंक असणाऱ्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा सदैव राहते. अशा लोकांचे जीवन राजासारखे होते आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात. चला जाणून घेऊया, कोणत्या जन्मतारखांच्या लोकांवर शिवशंकर कायम मेहरबान राहतात.

‘या’ लोकांवर भोलेनाथाची असीम कृपा!

मूलांक ७

अंकशास्त्रानुसार, जे लोक महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले असतात, त्यांचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा संबंध केतू ग्रहाशी असून हे लोक प्रामुख्याने शांत, आध्यात्मिक असतात. यांच्यात भगवान शिवविषयी ओढ असते. भोलेनाथाची भक्ती केल्याने त्यांना मानसिक शांती, आर्थिक समृद्धी आणि अध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद मिळतो. अनेकदा संकटे त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत, असंही म्हणतात.

मूलांक ५

ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. हा अंक बुध ग्रहाशी निगडित असून हे लोक बुद्धिमान, बोलण्यात कुशल, स्वभावाने नम्र असतात. आणि इतरांना मदत करण्यातही नेहमी पुढे येत असतात. हे लोक भोलेनाथाची भक्ती मनापासून करतात, त्यामुळे त्यांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात मोठे यश मिळते. त्यांचं यश हे फक्त मेहनतीचं नव्हे, तर शिवकृपेचं फळ असतं.

मूलांक ९

९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असतो. हा अंक मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. हे लोक अत्यंत धाडसी, मेहनती आणि जिद्दी असतात. शिवशंकरांवरील श्रद्धेमुळे ते संकटातही डगमगत नाहीत. त्यांच्या कठीण काळातही भोलेनाथ त्यांच्यासोबत असतात, त्यामुळे त्यांना समाजात मान-सन्मान, यश आणि प्रतिष्ठा मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)