Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह १ महिन्यानंतर राशिबदल करतो. त्यात तो वाणी, संवाद, व्यवसाय, शेअर बाजार व अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध जेव्हा जेव्हा राशिबदल करतो तेव्हा तेव्हा त्याचा त्या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. सप्टेंबरपासून बुध कन्या राशीत भ्रमण करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे करिअर आणि व्यवसायात नशीब चमकू शकते. या लोकांची आर्थिक क्षेत्रात भरभराट होईल.
मकर (Capricorn Zodiac Sign)
बुध ग्रहाचा राशिबदल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा आदर वाढेल आणि पैशांशी संबंधित समस्याही दूर होतील. या काळात तुम्हाला देशांतर्गत आणि परदेशात प्रवासाची संधी मिळेल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तसेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीत यश मिळू शकते.
सिंह (Leo Zodiac Sign)
बुध ग्रहाचे भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते . या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचे त्यांच्या अधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि करिअरमध्ये चांगली प्रगती साधता येईल. यावेळी, बँकिंग, मार्केटिंग, शिक्षण, मीडिया व गणित या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. तसेच यावेळी तुमचे कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या ( Virgo Zodic Sign)
बुधाचा राशिबदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही उत्तम कल्पना राबवून व्यवसायात प्रगती साधू शकता आणि चांगला नफादेखील मिळवू शकता. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल, समाजात तुम्हाला आदरही मिळेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते.