Budh Gochar 2025: नवीन वर्ष २०२५ सुरु झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे आणि शुभ ग्रह गोचर होत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, ४ जानेवारी २०२५ बुध ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाला वाणी, बुद्धिमत्ता, तर्कशक्तिचे कारक मानला जाते. याशिवाय बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. याप्रमाणे बुध ग्रह ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटे धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध या गोचरमुळे काही राशीचा लाभ होईल, काही नुकसान होईल.

कन्या (Virgo)

नवीन वर्षातील बुधाचे पहिले गोचर कन्या राशीसाठी खूप खास आणि लाभदायक आहे. या राशीच्या लोकांसाठी पैशाचे अनेक फायदे होतील. पैशाची बचत करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग निर्माण होतील. प्रवासात आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.

मकर (Capricorn)

बुधाचे हे गोचर या राशीच्या लोकांसाठी देखील विशेष आहे. बुध गोचर मकर राशीला कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.गोचर काळात बुध शत्रूंवर वर्चस्व गाजवेल. सामाजिक कार्यातून सन्मान वाढेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल.

हेही वाचा –जानेवारीमध्ये बुधादित्य राजयोगामुळे या ४ राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ! सूर्य अन् बुधची होईल विशेष कृपा

सिंह (Leo)

बुधाचे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी देखील अनुकूल मानले जाते. गोचरदरम्यान कोणतीही मोठी आर्थिक इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. उत्पन्नात प्रचंड वाढ होताना दिसेल. नवीन लोकांशी मैत्री. व्यापार्‍यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल.

कुंभ (Aquarius)

बुधाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य मजबूत करेल. आर्थिक लाभाचे अनेक योग होतील. उत्पन्नाच्या बाबतीत भाग्य तुम्हाला मदत करेल. व्यवसायात आर्थिक विस्तार करू शकाल. कुटुंबातील पालकांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. विवाहितांना सासरच्या पक्षाकडून अचानक लाभ मिळू शकतो. नोकरीची स्थिती मजबूत असेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल.

हेही वाचा –१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे नशीब चमकू शकते! धन लक्ष्मीबरोबर अनेक दुर्मिळ योग तयार होणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन (Pisces)

मीन राशीसाठी बुधाचे गोचरही अनुकूल आणि लाभदायक आहे. या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाची अपेक्षा करता येईल.