Budh Gochar 2025: नवग्रहामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. चंद्रानंतर बुध ग्रह सर्वात जलद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणारा ग्रह आहे. आज सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशी परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब चमकणार

मिथुन (Mithun Rashi)

बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

मेष (Mesh Rashi)

बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी लाभकारी ठरेल. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)