Budh Gochar 2025 Impact in Marathi: ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली, तर त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. बुध हा बुद्धिमता, संवाद व निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध देव जून महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. जूनमध्ये ग्रहांचा अधिपती बुध आपल्या स्वतःच्या राशी मिथुन व कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस लवकरच सुरू होऊ शकतात. या राशी असलेल्या भाग्यवान लोकांच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली पाहायला मिळू शकते. या शुभ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ…
बुधदेवाच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब पालटणार!
कन्या
बुध ग्रहाचे दोनदा राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी फार सकारात्मक ठरू शकते. यादरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे कार्य हाती घ्याल, त्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. तसेच, या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. काही काळ रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढू शकते.
तूळ
बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडण्याची शक्यता आहे. आकस्मिक पैसा मिळू शकतो. व्यवसायाची स्थिती भक्कम होऊ शकते. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. भौतिक सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. नोकरीत पदोन्नतीची चिन्हे आहेत. नोकरीच्या चांगल्या ऑफरही मिळू शकतात. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या योजना यशस्वी होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात.
मीन
जून महिन्यातील बुधाचे दोनदा गोचर मीन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची चिन्हे आहेत. घरात काही शुभ कार्य होऊ शकते. नोकरीच्या शोधात लोकांसाठी चांगला काळ निर्माण होऊ शकतो, फायदेशीर परिणाम मिळू शकतात. तुमच्या कामामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. यावेळी तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. सुखात वाढ होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही पैशांची बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)