Budh Gochar 2025:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध देवाला बुद्धी व तर्कशुद्ध विचारांचे कारक मानले जाते. जेव्हा बुध ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा प्रभावित राशींना धन-संपत्ती, समृद्धीसह सौभाग्य लाभण्याची संधी असते. येत्या १६ दिवसांत म्हणजेच २४ मे रोजी दुपारी १.१३ वाजता बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तीन राशींच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी धनवर्षाव करू शकते आणि येत्या काळात या मंडळींना प्रगतीच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या आणि त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊ…

‘या’ राशींच्या लोकांना होणार अपार धनलाभ?

कर्क

बुध देवाच्या गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कन्या

बुध देवाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात नोकरदार लोकांना करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमचे रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन, आर्थिक स्थिती सुधारू शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर-कार खरेदी करू शकता. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कुंभ

बुध देवाचा राशिबदल कुंभ राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे कारण ठरू शकते. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करू शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)