Mercury Transit in Gemini June 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध देव हे बुद्धी व तर्कशुद्ध विचारांचे कारक मानले जातात. जेव्हा बुध ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा प्रभावित राशींना धन-सहानी समृद्धीसह सौभाग्य लाभण्याची संधी असते. येत्या दहा दिवसात म्हणजेच २४ जूनला बुध ग्रह स्वराशी मिथुनमध्ये प्रवेश करणार आहेत. या राशी गोचरासह ‘भद्र राजयोग’ सुद्धा तयार होत आहे. ज्यामुळे येत्या काळात ४ राशींच्या नशिबाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. या राशींवर माता लक्ष्मी धनवर्षाव करू शकते व येत्या काळात या मंडळींना प्रगतीच्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना अनेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…
२४ जूनपासून ‘या’ राशींना रातोरात मिळणार श्रीमंती?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
बुध गोचर होताच आपल्या आयुष्यात काही नवीन व्यक्तींचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. आपण नवीन मित्रांशी जोडले जाऊ शकता ज्यांच्यामुळे तुमच्या करिअरला सुद्धा वेग येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्याच्या बळावर प्रचंड धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. काम व छोट्या मोठ्या कारणांसाठी एखाद्या दूरच्या प्रवासाचे योगआहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभू शकते. आई वडिलांचे आरोग्य उत्तम राहू शकते ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण- तणाव कमी झाल्याचे जाणवू शकते.
मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)
या राशीचे स्वामी स्वतः बुध देव आहेत आणि येत्या २४ जूनला मिथुन राशीतच गोचर करून बुध भद्र राजयोग तयार करत आहेत. या काळात मिथुन राशीच्या मंडळींना काम पूर्णत्वाकडे नेण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा. तसेच समाजात आपले नाव मोठे करण्यासाठी चालताना- बोलताना- वागताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे. कुटुंबाच्या सदस्यांच्या मदतीने तुम्हाला धनलाभाचे योग आहेत/ कामाच्या ठिकाणी तुम्हाला कौतुकास्पद कामगिरी करता येईल/ नोकरदार मंडळींना गुंतवणुकीवर भर द्यायला हवा.
सिंह रास (Leo Zodiac Horoscope)
बुध गोचर होताच तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावरील कार्यभार वाढू शकतो पण याचा परिणाम तुमची क्षमता सिद्ध करण्यावर होऊ शकतो आणि ज्यामुळे तुम्ही वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकता. तुम्हाला बुध गोचारापासून ते राज्योगाच्या एकूण एक टप्प्यात विविध आर्थिक स्रोतांच्या माध्यमातून धनप्राप्ती होऊ शकते. तुमच्या आयुष्यात प्रेम व वैवाहिक सुख अपार वाढू शकते.
हे ही वाचा << शनीदेव जूनच्या शिवरात्रीपासून ‘या’ ५ राशींना करणार कोट्याधीश? प्रचंड धनलाभ मिळवू शकणाऱ्या राशींमध्ये तुम्ही आहात?
धनु रास (Sagittarius)
बुध ग्रहाचा मिथुन राशीत सप्तम स्थानी प्रवेश होणार आहे, हे स्थान आपल्या कुंडलीतील सर्वात लाभदायक स्थान म्हणून ओळखले जाते. यामुळे आपल्याला रातोरात श्रीमंती प्राप्त होऊ शकते. तुमचे आई वडीलच तुमच्या यशाचा पहिला टप्पा घडवू शकतात. हे गोचर नोकदरदार मंडळींना अधिक फायदेशीर ठरू शकते. प्रवासात काळजी घेण्याची गरज आहे. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला समाधानी वाटू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)