Budh Gochar after Navratri: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह साधारणपणे १ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि मित्र यांचा कारक मानले जाते. म्हणूनच बुध ग्रहाच्या हालचालीत बदल झाला की त्याचा परिणाम या गोष्टींवर आणि सर्व राशींवर होतो.
नवरात्रीनंतर ३ ऑक्टोबरला व्यापाराचे दाता बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ३ राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते. त्यांना अचानक धनलाभ होण्याची आणि भाग्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. चला तर मग पाहूया त्या राशी कोणत्या आहेत…
कन्या राशी (Virgo Horoscope)
तुमच्यासाठी बुध ग्रहाचा गोचर फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून धन आणि वाणीच्या स्थानी फिरणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच बुध ग्रह तुमच्या राशीचे स्वामी आहेत, म्हणून या काळात तुम्ही ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण होतील.
या काळात तुमच्या बोलण्यात आणि संवादात सुधारणा होईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. या राशीचे जे लोक लेखनसारख्या सर्जनशील कामाशी जोडलेले आहेत त्यांना मेहनतीचे फळ म्हणून मान-सन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची पगारात वाढ होऊ शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. या काळात कामानिमित्त तुम्हाला छोट्या प्रवासाला जावे लागेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच आई आणि सासरच्या लोकांशी संबंधही गोड राहतील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
बुध ग्रहाचा गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही लहान किंवा मोठा प्रवासही करू शकता. तसेच सामाजिक वर्तुळ वाढेल आणि त्यामुळे तुमचा मान-सन्मानही वाढेल.