scorecardresearch

Budh Ast: बुध ग्रह कुंभ राशीत अस्त, ‘या’ तीन राशींना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या उपाय

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा राशी बदलतो किंवा अस्त-उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध १८ मार्च रोजी अस्त झाला आहे.

Budh_Grah_Gochar
Budh Ast: बुध ग्रह कुंभ राशीत अस्त, 'या' तीन राशींना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या उपाय

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा राशी बदलतो किंवा अस्त-उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध १८ मार्च रोजी अस्त झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह व्यवसाय, संवाद, गणित, हुशारी आणि तर्क संवाद यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशी आहेत, ज्यांना या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत?

मेष : बुध ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी थोडी त्रासदायक ठरू शकते. कारण बुध तुमच्या अकराव्या भावात अस्त झाला आहे. ज्याला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुम्हाला व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये घट होऊ शकते. करार अंतिम टप्प्यात थांबू शकतो. त्याचबरोबर या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा. कारण ही वेळ अनुकूल नाही. कामाच्या ठिकाणी एखादे लक्ष्य अपूर्ण राहू शकते.

उपाय : बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी विशेषत: विष्णु सहस्रनामाचे पठण, दुर्गा सप्तशती, गणेशाची उपासना विशेष फलदायी असल्याचे सांगितले आहे. गणेशजींना पूजेत दुर्वा अर्पण केल्याने खूप फायदा होईल.

वृषभ : बुध तुमच्या राशीतून दहाव्या भावात आहे. या स्थानाला नोकरी आणि करिअरचं स्थान म्हणतात. या काळात तुम्ही नवीन नोकरीच्या संधी गमावू शकता. या काळात तुमच्यावर कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा दबाव असेल आणि तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंधही बिघडू शकतात. त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम आणि चांगली कामगिरी करूनही कामाच्या ठिकाणी योग्य आदर आणि सन्मान मिळवू शकणार नाही. यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढू शकतो. या काळात व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो.

उपाय : बुध ग्रह बलवान होण्यासाठी बुधवारी दान करा. बुध ग्रहाला बलवान बनवण्यासाठी मूग, छोटी वेलची, पालक, हिरवे कपडे, हिरवे खाद्यपदार्थ आणि ज्ञानविषयक पुस्तके दान करू शकतात.

Astrology: कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील, तर वैवाहिक जीवन होतं सुखमय

मिथुन : बुध ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी थोडी त्रासदायक ठरू शकते. कारण बुध तुमच्या नवव्या घरात प्रवेश करेल. या स्थानाला भाग्याचं स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ कमी मिळेल. तुमचे सुरू असलेले काम अडकू शकते. व्यवसायात करार अंतिम टप्प्यात थांबू शकतो. कर्मचार्‍यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात व्यावसायिक सहल न केल्यास अधिक चांगले होईल. कारण धनहानी होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

उपाय : बुध ग्रहाला बळ देण्यासाठी गच्चीवर किंवा घरात जेथे सूर्यप्रकाश असेल तेथे हिरव्या काचेच्या बाटलीत शुद्ध पाणी ठेवा. त्याला तेथे ७ दिवस ७ रात्री राहू द्या. यानंतर या पाण्याचे सेवन केल्याने बुध ग्रह बलवान होऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budh grah ast in kumbh rashi march 2022 rmt

ताज्या बातम्या