Budh Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा युवराज बुध काही काळानंतर राशी बदलत असतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर कुठे ना कुठे नक्कीच दिसतो. सध्या बुध कर्क राशीत आहे आणि वक्री अवस्थेत आहे. ११ ऑगस्ट रोजी तो याच राशीत मार्गी होईल. बुध ११ ऑगस्टला दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी मार्गी होणार आहे. बुध मार्गी झाल्यावर काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग पाहूया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
ही गोष्ट लक्षात ठेवा की, ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह अनुकूल आहे, त्यांना बुध मार्गी झाल्यावर चांगले परिणाम मिळतील. पण, ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह अनुकूल नाही, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या कुंडलीत तिसऱ्या व सहाव्या भावाचा स्वामी असलेला बुध आता चौथ्या भावात मार्गी होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. आईसोबतचे नाते सुधारू शकते. हळूहळू जीवनात आनंद येऊ शकतो. जमीन-मालमत्तेशी संबंधित प्रकरणातही फायदा होऊ शकतो. भौतिक सुखे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध बनू शकतात. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
बुध मार्गस्थ होणे मिथुन राशीच्या लोकांसाठीसुद्धा भाग्यशाली ठरू शकते. या राशीच्या लग्नाचा स्वामी असलेला बुध दुसऱ्या भावात मार्गी होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळू शकते. त्यामुळे आयुष्यातील जुनी अडचण दूर होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. बोलण्यात चांगला संयम राहू शकतो. नातेवाइकांशी चांगले संबंध तयार होऊ शकतात.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लग्न आणि कर्म भावाचा स्वामी असलेला बुध आता लाभ भावात मार्गी होणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. व्यापारात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील. तसेच मुलांसंबंधी समस्या संपण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)