Today’s Horoscope : १५ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपर्यंत राहील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे, त्यानंतर हस्त नक्षत्र दिसेल. आज राहू काळ ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजित मुहूर्त (शुभ वेळ) १२ वाजून ६ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल.याशिवाय दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी बुध मीन राशीत वक्री होईल. तसेच आज वसंतोत्सवारंभ आहे. बुधाच्या राशी परिवर्तनाने तुमच्या नशिबात काय बदलणार हे आपण जाणून घेऊया…

१५ मार्च पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :

मेष:- मानसिक चांचल्य जाणवेल. लहानांच्यात लहान होऊन खेळाल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ:- काही क्षणिक गोष्टींचा लाभ घ्याल. स्त्रियांच्या सहवासात राहाल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मानाने पैसे कमवाल.

मिथुन:- कामात द्विधावस्था जाणवेल. सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल. सामाजिक दर्जा सुधाराल.

कर्क:- जोडीदाराचे विचार आग्रही वाटू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य करावे लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे विचार विरोधी भासतील. स्वभावातील मानीपणा वाढेल. आपला मान जपण्यासाठी प्रयत्न कराल.

सिंह:- आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार वाढू शकतात. पत्नीच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसून येईल. कामातील व्यावहारिक बाजू जाणून घ्यावी. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल.

कन्या:- मुलांचे धाडस वाढेल. कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद संभवतात. आपल्या संपर्काचा वापर करावा.

तूळ:- प्रवासात मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती लक्षात घ्यावी. घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा. वाचनाची आवड पूर्ण कराल.

वृश्चिक:- कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा विस्तार वाढवावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. जवळच्या मित्रांच्या सहवासात वावराल.

धनू:- फार काळजी करत बसू नका. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागेल. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल. जबाबदारीने गोष्टी हाताळाल.

मकर:- आत्मविश्वास ढळू देवू नका. काही गोष्टी मनाशी पक्क्या कराव्या लागतील. कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी. गोड बोलून कामे करून घ्याल. हातातील अधिकार वापराल.

कुंभ:- सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत-हसत कामे साध्य करून घ्याल. फार हटवादीपणा करू नका. अति विचार करू नयेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:- मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. उगाच दिखाऊपणा करायला जाऊ नका. शांतपणे धोरण ठरवावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर