Budh Uday 3 October Horoscope: ज्योतिष पंचांगानुसार ग्रह ठराविक काळाने अस्त आणि उदय होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसतो. हा बदल काहींसाठी चांगला तर काहींसाठी वाईट ठरतो.
बुध ग्रह म्हणजेच बुद्धी देणारा ग्रह ३ ऑक्टोबरला आपल्या स्वराशीत म्हणजे कन्या राशीत उदयाला येत आहे. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते. तसेच गाडी किंवा मालमत्ता घेण्याची संधी मिळू शकते. चला तर मग पाहू या त्या राशी कोणत्या आहेत…
वृषभ राशी (Taurus Horoscope)
बुध ग्रहाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात उदयाला येणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. बोलण्यात गोडवा आणि प्रभाव येईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात बघितले तर, वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. कुटुंबासोबत आनंदाचे आणि आठवणींचे क्षण घालवता येतील. तसेच ज्यांचे काम-व्यवसाय मार्केटिंग, बँकिंग, मीडिया किंवा वाणीशी संबंधित आहे त्यांना या काळात विशेष फायदा होईल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
तुमच्यासाठी बुध ग्रहाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावात उदयाला येणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचे नशीब उजळू शकते. अडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही देश-विदेश प्रवास करू शकता. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. तसेच जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे इच्छितात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
मीन राशी (Pisces Horoscope)
तुमच्यासाठी बुध ग्रहाचा उदय सकारात्मक ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून भौतिक सुख आणि मालमत्तेच्या भावात उदयाला येणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला जमीन-जुमला किंवा वाहन मिळू शकते. अचानक पैसा मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्ही सुरू करणार असलेला नवा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल. या काळात तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. भांडवल गुंतवणुकीतही फायदा होईल. संधींचा योग्य फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी ठराल. तसेच आई आणि सासरच्या मंडळींसोबतचे संबंध चांगले राहतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)