Budhwa Mangalwar : ज्येष्ठ महिन्यातील सर्व मंगळवारांना बुधवा मंगळवार म्हणतात. याशिवाय याला मोठा मंगळवार सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मातील आजचा मंगळवार खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. बुधवा मंगळवारी हनुमानाची उपासना केली जाते. व्रत केले जातात. आज पहिला बुधवा मंगळवारी ब्रह्म योग निर्माण होत आहे ज्याचा फायदा राशीचक्रातील चार राशींना होणार आहे. या राशींवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येईल. त्या चार राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.
बुधवा मंगळवार लिस्ट
पहिला बुधवा मंगळवार – २८ मे
दुसरा बुधवा मंगळवार – ४ जून
तिसरा बुधवा मंगळवार – ११ जून
चौथा बुधवा मंगळवार – १८ जून
वरील बुधवा मंगळवार अत्यंत शुभ असून या दिवशी हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते.
जाणून घेऊ या, पहिला बुधवा मंगळवार कोणत्या राशींसाठी फायद्याचा ठरणार आहे. चार राशी खालील प्रमाणे –
मेष राशी –
पहिला मोठा मंगळवार मेष राशीसाठी शुभ ठरू शकतो. हनुमानाची कृपा मेष राशीवर दिसून येईल. या लोकांच्या आयुष्यात धन धान्य वाढेल. प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि गुंतवणूकीसाठी हा दिवस उत्तम आहे.
वृश्चिक राशी –
पहिला मोठा मंगळवार वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद पसरवेल. या लोकांची ऊर्जा वाढेल, उत्साह वाढेल. या लोकांचा खर्च वाढणार पण पगारवाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी –
वृषभ राशीच्या लोकांना हा पहिला मोठा मंगळवार लाभ देणारा आहे. या लोकांना धन संपत्ती आणि यश मिळू शकते. व्यवसायात खर्च वाढू शकतो त्यावर नियंत्रण ठेवा तरच तुम्ही पैशांची बचत करू शकता.
कुंभ राशी –
कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठा मंगळवार लाभदायक ठरणार आहे. या राशीचे लोक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकतात.महत्त्वाचे काम पूर्ण होतील. कमाईचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आनंद दिसून येईल. या लोकांना नशीबाची साथ मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)