नवरात्र हा हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. या दिवसात भक्त देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्रीचा उत्सव वर्षातून चार वेळा येतो. ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्री व्यतिरिक्त दोन गुप्त नवरात्री असतात. आयावर्षी चैत्र नवरात्री २ एप्रिलपासून सुरू होत आहे आणि हा उत्सव ११ एप्रिलपर्यंत साजरा केला जाईल. नवरात्रीत कलशाची स्थापना केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. नवरात्रीत कलशाची पूजा आधी केली जाते आणि त्यानंतर देवी दुर्गेची पूजा सुरू होते. वास्तविक भगवान विष्णू कलशाच्या मुखावर वास करतात आणि रुद्र म्हणजे भगवान शिव कंठात आणि ब्रह्माजी मुळात वास करतात. म्हणून कलशाची पूजा केल्याने त्रिदेवाची पूजा होते. चला जाणून घेऊयात घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा पद्धती…

घटस्थापना शुभ मुहूर्त

प्रतिपदा प्रारंभ तिथी: १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून सुरू होईल.
प्रतिपदा समाप्ती तिथी: २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत
चैत्र घटस्थापना: शनिवार,२ एप्रिल २०२२ रोजी
घटस्थापना शुभ मुहूर्त: सकाळी ६ वाजून २२ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटे
घटस्थापना अभिजीत मुहूर्त: दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असेल.

नवरात्रीच्या पूजा साहित्याची यादी: रुंद तोंडाचे मातीचा कलश (हवे असल्यास सोने, चांदी किंवा तांबे देखील घेऊ शकता), माती, सात प्रकारची धान्ये, पाणी, गंगाजल, सुपारी, आंबा किंवा अशोकाची पाने, अक्षत म्हणजे, अख्खा तांदूळ, नारळ, लाल कापड, फुलांचे हार, कलश झाकण्यासाठी झाकण, फळे, मिठाई, जव.

Budh Ast: बुध ग्रह कुंभ राशीत अस्त, ‘या’ तीन राशींना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या उपाय

घटस्थापना पूर्ण पद्धत: कलशाची स्थापना करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. तसेच कलश बसवण्यापूर्वी लाल कपड्यावर मातेची मूर्ती बसवावी, त्यानंतर भांड्यात माती टाकून त्यात जवाचे दाणे टाकावेत. त्यानंतर मधोमध कलश ठेवून त्यावर मोळी बांधून स्वस्तिक बनवावे. तसेच कलशावर तिलक लावून त्यावर पाणी किंवा गंगाजल भरावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलशात या शुभ गोष्टी अवश्य ठेवा: कलशात संपूर्ण सुपारी, पंचरत्न, फुले, अत्तर, नाणे आणि आंबा किंवा अशोकाची पाने टाका. पाने अशा प्रकारे ठेवावी की ती बाहेरून थोडी दिसतील.त्यानंतर कलश झाकणाने झाकून त्या झाकणावर अक्षत ठेवा. आता कलशावर नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि त्यावर रक्षासूत्र बांधा. तसेच देवतांचे आवाहन करून कलशाची पूजा सुरू करा. त्याचबरोबर सर्वप्रथम कलशाला तिलक लावून त्यावर अक्षत अर्पण करावे. फुलांच्या माळा घालाव्यात आणि कलशावर अत्तर आणि नैवेद्य म्हणजेच फळे आणि मिठाई इत्यादी अर्पण कराव्यात. नऊ दिवस रोज जव पेरलेल्या ठिकाणी पाणी शिंपडत राहा.