आचार्य चाणक्य यांना समाजाला सभ्य बनवण्यासाठी नीती ग्रंथ ‘चाणक्य नीती’मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. आचार्य आपल्या चाणक्य धोरणात म्हणतात की, ७ प्रकारचे प्राण्यांना झोपेतून जागे करणे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

अहिं नृपं च शार्दूलं बरटिं बालकं तथा।
परश्वानं च मूर्खं च सप्त सुप्तान्न बोधयेत्।।

हेही वाचा – गरीब व्यक्तीलाही धनवान करू शकते ‘ही’ चाणक्य नीती? फक्त करू नका ‘या’ चुका

या श्लोकात आचार्य स्पष्ट करतात…

१. झोपेत असताना कोणत्याही राजा किंवा अधिकाऱ्याला उठवू नये, असे केल्याने तुम्हाला राजाच्या क्रोधाचे बळी व्हावे लागू शकते.
२. झोपलेल्या सिंहाला उठवू नये किंवा त्याला छेडण्याचा प्रयत्न करू नये. जर तो जागे झाला तर त्याला मृत्यूला सामोरे जावे लागू शकते.
३. झोपलेला साप जर जागे झाला तर तो चावण्याचा प्रयत्न करतो, अशावेळी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.
४. लहान मुलाला झोपेतून उठवू नये, कारण तो उठल्यानंतर त्याला सांभाळणे कठीण होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – कोणत्याही व्यक्तीसाठी ‘या’ चार ठिकाणी राहणे म्हणजे मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

५. हिंसक प्राणी किंवा भटक्या कुत्र्या झोपेत असताना उठवू नयेत. जागे झाल्यावर ते रागाने तुमच्यावर हल्लाही करू शकतात.
६. झोपेत असताना मूर्ख व्यक्तीला कधीही उठवू नये, कारण मूर्खाला समजावून सांगणे खूप अवघड असते, अशा स्थितीत उठल्यानंतर तो तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकतो. त्यामुळे मुर्ख व्यक्ती झोपलेला असणे समाजासाठी फायदेशीर आहे.
७. डंक मारणार्‍या कीटकांची झोप मोड करू नये. त्याला जाग आली तर मृत्यूही येऊ शकतो.