Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य हे एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणांच्या बळावर चंद्रगुप्त मौर्यासारख्या साध्या मुलाला मगधचा सम्राट बनवले. चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये आपण जीवनात यश कसं मिळवू शकतो हे सांगितले आहे. जर एखाद्याने चाणक्य नीतिचे पालन केले तर तो सर्वात कठीण समस्या देखील सोडवू शकतो. चाणक्य नीतिमध्ये आपण इतरांना आपल्याकडे कसे आकर्षित करू शकतो, हे देखील सांगितले आहे. याशिवाय आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दलही सांगितले आहे. जाणून घ्या भर गर्दीतही महिलांना पुरुषांच्या काही सवयी पटकन लक्षात येतात, चला जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की, गर्दीच्या मेळाव्यात महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतात. चाणक्य नीतिनुसार महिलांना पुरुषांची प्रामाणिकता लक्षात येते. स्त्रिया प्रामाणिक असलेल्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. स्त्रियांना असे पुरुष आवडतात, जे कधीही फसवणूक करत नाहीत.

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ मृत्यू? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या

महिलांना असे पुरुष आवडतात, जे लक्षपूर्वक ऐकतात. चाणक्य नीतिनुसार, गर्दीतही महिलांना लक्षात येतं की, त्यांचं कोण लक्षपूर्वक ऐकतंय आणि कोण नाही. महिलांना त्यांचा जोडीदार असा असावा की त्यांना त्यांचे बोलणे ऐकून समजून घेऊ शकेल. महिलांना त्यांच्या जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडते.

चाणक्य नीतिनुसार, पुरुष इतरांशी कसे वागतात हे महिला लक्षात घेत असतात. ते इतरांशी गैरवर्तन तर करत नाही ना? गोड बोलणारे पुरुष महिलांना खूप आवडतात. विनयशील स्त्रिया पुरुषांकडे सहज प्रभावित होतात.

चाणक्य नीतिनुसार, महिलांना खोटं बोलणारे लोक अजिबात आवडत नाहीत. पुरुष त्यांच्याशी खोटं बोलत नाही याची महिला विशेष काळजी घेतात. स्त्रियांना खरं बोलायला खूप आवडतं. स्त्रियांना सत्यवादी पुरुष आवडतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti women notice these habits of men in a crowded gathering prp
First published on: 25-09-2022 at 11:23 IST