Chandrayaan 3 Landing 2023: भारताची महत्त्वकांक्षी चांद्रमोहीम आता शेवटच्या टप्यात पोहोचली आहे. चंद्रयान ३ चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चंद्रायानाच्या लँडिंगसाठी २३ ऑगस्ट हा दिवस निवडण्यामागे अनेक कारणं होती. पण याच निवडीचा चंद्रयानाच्या यशावर सुद्धा प्रभाव मुळे पडणार आहे असे दिसतेय. प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी २३ ऑगस्ट या दिवसामुळे चंद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरणार असा विश्वास दर्शवला आहे. यामागे नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख व नाव सुद्धा एक भक्कम बाजू ठरणार आहे. खालडीयन अंकसूत्र पाहता नेमकं हे गणित काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया…

नरेंद्र मोदी यांचा भाग्यांक काय?

नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख: १७ सप्टेंबर १९५० म्हणजेच १७\०९\१९५०. या आकड्यांची बेरीज केल्यास आपल्याला भाग्यांक शोधता येईल.

१७ = १+७ = ८
०९= ०+९= ९
१९५०= १+९+५+०= १५ = १+५= ६

८+९+ ६= ३२= ३+२ = ५

खालडीयन अंकसूत्र

यावरून नरेंद्र मोदी यांचा भाग्यांक आहे ५. नरेंद्र मोदी यांच्या जन्मतारखेत ५ व ८ याचा अधिक प्रभाव दिसून येतो. आता आपण खालडीयन पद्धतीनुसार नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या स्पंदनाची बेरीज करूया.

N A R E N D R A : ५+१ +२ +५+ ५ +४+ २+१= २५
MODI: ४ +७+४+ १= १६

१६+ २५ = ४१= ४ +१ = ५

आता आपण पाहू शकता की मोदींचा भाग्यांक ५ व नावाच्या स्पंदनाची बेरीज करून एकांक सुद्धा पाच येतो. याच पद्धतीने आपण चांद्रयान या नावाचा सुद्धा एकांक काढून घेऊया.

CHANDRAYAAN 3: ३+५+१+५+४+२+१+१+१+१+१+५+३= ३१= ३+२=५

तसेच चंद्रयान चंद्रावर सोडण्याची तारीख सुद्धा जाणून घेऊया..

१४-०७-२०२३: १+४+०+७+२+०+२+३= १९= १+९= १०= १

चंद्रयान पाठवण्याची तारीख = १+४= ५ याशिवाय भाग्यांक १ हा नरेंद्र मोदींच्या ५ या भाग्यांकाचे मित्रांक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिनांक २३-०४- २०२३ या तारखेत २+३= ५ हा मूलांक आजच्या तारखेत दिसून येत आहे. २०२३ मधील २३ वे वर्ष २+३= ५ आणि विशेष म्हणजे हे यान पूर्ण प्रवास करून ४१ व्या दिवशी चंद्रावर उतरणार आहे. ४+१ = ५

हे ही वाचा<< भाग्यांक कसा ठरतो? तुमचा भाग्यांक कसा ओळखाल?

दरम्यान, या एकूण आकडेवारीनुसार नरेंद्र मोदींच्या भाग्यांकाचे चंद्रयान चंद्रावर उतरून जगात बाजी मारणार हे नक्की असे उल्हास गुप्ते यांनी सांगितले आहे.