आपण दररोज नीटनेटके कपडे परिधान करून घराबाहेर पडतो. कपडे परिधान करताना ड्रेस सेन्स आणि मॅचिंगची आपण विशेष काळजी घेतो. हे आपण चांगले दिसण्यासाठी करत असलो, तरीही कपड्याच्या रंगाचा आपल्या आयुष्याशी खूप घट्ट संबंध असतो. आपल्या मनावर वेगवेगळ्या रंगांचा खूप खोलवर प्रभाव होतो. काही रंग थंडावा देतात तर काही रंग ऊर्जा वाढवतात. त्याचबरोबर काही रंग मनाला जड करतात, तर काही रंग मनाला आनंद देतात. रंगांचे स्वतःचे सखोल विज्ञान आहे. आज कोणत्या दिवशी कोणते कपडे घालावेत आणि कोणते रंग टाळावेत याबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

>> रविवारी क्रीम रंगाचे कपडे घालणे चांगले. जर आपण यासह कॉम्बिनेशन केले तर गुलाबी, सोनेरी, हलका केशरी इत्यादी यासोबत परिधान करता येईल. परंतु रविवारी निळे, काळा, राखाडी आणि तपकिरी रंगाचे कपडे घालणे टाळावे.

>> सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी काळे आणि चमकदार लाल रंगाचे कपडे टाळावेत. तसेच अतिशय हलक्या शेड्स घ्याव्यात.

Chandra Grahan 2022 : यंदाचे चंद्रग्रहण ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार शुभ; मिळतील खूप फायदे

>> मंगळवारी तुम्ही लाल रंगसंगतीचे कपडे परिधान केले तर ते तुमच्यावर चांगले दिसतील. गुलाबी, लाल रंगाशी संबंधित कोणतीही शेड तुम्ही घालू शकता. लाल शेड व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये क्रीम आणि फिकट पिवळा रंग देखील समाविष्ट करू शकता, परंतु लक्षात ठेवा की या दिवशी चमकदार हिरवे कपडे घालू नका.

>> बुधवारी स्पोर्टी लूकमध्ये काही हिरवे कपडे घालता येतील. जर तुम्ही सकाळी खेळायला किंवा जॉगिंगला गेलात तर तुम्ही हिरवा ट्रॅक सूट घालावा. काही जण ऑफिसमध्ये पिस्ता म्हणजे फिकट हिरवा रंग घालू शकतात. आपण त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हलका राखाडी किंवा काळा रंग जोडू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काळा रंग फक्त पॅंट किंवा स्कर्टच्या रुपात परिधान केला पाहिजे.

>> गुरुवारी तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये भगवा रंग घालू शकता. तसे, आपण या दिवशी पिवळ्या शेड्स देखील घालू शकता. क्रीम, पांढरे आणि गुलाबी रंगाचे कपडे त्यांच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये घालता येतात. गुरुवारी पारंपरिक पोशाख परिधान करण्याला प्राधान्य द्यावे.

गालावर खळी असणाऱ्या मुलींमध्ये असते ‘ही’ खास गोष्ट; देवी लक्ष्मीची असते विशेष कृपादृष्टी

>> शुक्रवारी पार्टीवेअर कपडे घालण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, कारण हा दिवस शुक्राचा आहे. काही चमकणारे कपडे घालावेत. राखाडी, काळा, निळा आणि हलका हिरवा अशा सर्व छटा रंगांमध्ये परिधान केले जाऊ शकतात. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.

>> शनिवारी निळा, काळा, राखाडी आणि हिरवा रंग परिधान करू शकता. चौकोनी आणि पट्टेदार कपडे देखील परिधान केले जाऊ शकतात. परंतु या दिवशी लाल रंग परिधान करू नये आणि काळा आणि लाल रंगाचे मिश्रण नसावे हे देखील लक्षात ठेवा.

शुक्रवारी नवीन कपडे घालणे खूप शुभ आहे, याशिवाय बुधवार आणि गुरुवारी तुम्ही नवीन कपडे घालू शकता. मंगळवार आणि रविवारी नवीन कपडे परिधान करू नयेत, तसेच या दिवशी नवीन कपड्यांची खरेदीही करू नये कारण नवीन कपडे ट्रायल रूममध्ये परिधान करावे लागतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Color has a big impact on life find out what color clothes will benefit you on which day pvp
First published on: 13-05-2022 at 10:55 IST