- मेष : आर्थिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. रागावर नियंत्रण ठेवावं. महत्वाचे
निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. - वृषभ : आपले आरोग्य उत्तम राहिल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायाची बीजं पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.
- मिथुन : महत्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्जप्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
- कर्क : कामात मित्रपरिवाचे सहकार्य लाभेल. गाण्याच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी
व्हाल. आपल्याला प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात दगदग झाली तरी फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. - सिंह : संतती बद्दल सुवार्ता कानी येईल. मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.
- कन्या : नोकरीतील चांगल्या कामाबद्दल वरिष्ठ प्रशंसा करतील. काही महत्वाचे निर्णय घ्यावे
लागतील. आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. - तूळ : आज आपल्याला अचानक धनलाभाची शक्यता. आजचा दिवस भावंडसौख्यास अनुकूल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजेखातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
- वृश्चिक : भागिदारीत व्यवसायात कार्यक्षेत्र वाढण्यास अनुकूल दिवस. आपले निर्णय योग्य ठरतील. वैवाहिक सौख्य लाभेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
- धनु : तब्येतीच्या तक्रारी राहतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. नोकरीत कामाची दगदग
जाणवेल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. - मकर : संततीच्या विवाहासंबंधी बोलणी चालू असतील त्यात यश मिळेल. आजचा दिवस आपली इच्छापूर्ती होण्यास अनुकूल. गुंतवणूकीसाठी अनुकूल योजना समोर येतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागेल. आकर्षक खरेदी कराल.
- कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. नोकरीतील महत्वांची कामं सुरळीतपणे पार पडतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.
- मीन : आपलं मनोबल वाढणाऱ्या घटना घडतील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडण्यास अनुकूल दिवस. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील.
— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2020 रोजी प्रकाशित
आजचं राशीभविष्य, शनिवार, २६ डिसेंबर २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 26-12-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology horoscope saturday 26 december 2020 aau