Daily Rashibhavishya in Marathi, 11 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Paranoid Personality Disorder, PPD, personality disorders, behavioral patterns, mental health, psychotherapy, DSM-5, family dynamics, trust issues, mental illness, symptoms, treatment, chaturang article,
स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
jupiter transit Earn lots off money of the people of these three signs
३०० दिवस कमावणार बक्कळ पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या लोकांची आर्थिक समस्या होणार दूर
Shrawan 2024 Rashi Bhavishya
श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग
Shani Margi
शनिदेव बदलतील चाल! १२५ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होणार अपार श्रीमंत? तुमच्या नशिबात आहे का सुख?
Mangal Gochar 2024
मंगळाचे राशी बदल! ४५ दिवस ‘या’ ६ राशींच्या जीवनात मोठे संकट येण्याची शक्यता; होऊ शकते आर्थिक नुकसान
mars saturn sextile What does this planetary movement mean for your zodiac sign magal shani sextile at 60 degree angle these zodiac sign will get rich soon
आता पालटणार ‘या’ राशींचे नशीब! १०० वर्षांनंतर शनि अन् मंगळाचा दुर्मीळ संयोग; अचानक होणार धनलाभ, तिजोरी भरणार?
268 days Happiness and prosperity in the life
पुढचे २६८ दिवस पैसाच पैसा! शनीच्या कृपेने ‘या’ चार राशीधारकांच्या आयुष्यात सुख-समृद्धी

वृषभ:-

कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे.

मिथुन:-

आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:-

आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:-

मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:-

व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:-

आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:-

जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:-

लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:-

भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:-

स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.