scorecardresearch

Premium

Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींना पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, २९ नोव्हेंबर २०२३ (Photo – Freepik)

Daily Rashibhavishya in Marathi, 29 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

7th March After 18 Years Budh Rahu Yuti In Meen Rashi These Five Zodiac Signs Kundali 360 degree Turn Can Become Crorepati
१८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?
Budh Gochar 2024
आजपासून ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार? बुधदेवाच्या कृपेने अचानक ‘या’ रूपात लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी
shani asta chal will be lucky for these zodiac signs
Shani Dev : २४ तासानंतर चार राशींचे नशीब पालटणार! शनिदेवाच्या कृपेने या लोकांना होणार अचानक धनलाभ
Surya Mangal yuti
१० वर्षांनी ‘आदित्य मंगल’ योग बनल्याने ‘या’ राशी होतील लखपती? सूर्य-मंगळाच्या युतीने तुम्हीही होऊ शकता मालामाल

वृषभ:-

कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

मिथुन:-

आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क:-

गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह:-

काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या:-

खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ:-

आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक:-

कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू:-

जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्‍यांना मदत कराल.

मकर:-

बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ:-

मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन:-

अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 29 november daily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 28-11-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×