- मेष:-
लहान प्रवास घडेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. सद्गुणांचा विकास करता येईल. - वृषभ:-
जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतवैचित्र दर्शवू नका. कौटुंबिक वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत. भागीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. - मिथुन:-
प्रेमसंबंधात वाढ होईल. आर्थिक लाभाचा विचार करावा. प्रवासाचे योग येतील. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. ठाम निर्णयाची गरज भासेल. - कर्क:-
आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. पचनाचे विकार संभवतात. जोडीदाराच्या मताचा पुनर्विचार करावा. भागीदारीतील धोरण नीट जाणून घ्या. - सिंह:-
प्रेमसंबंध सुधारतील. मुलांचे कौतुक कराल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. तुमची धार्मिकता वाढेल. चांगले साहित्य वाचाल. - कन्या:-
कौटुंबिक स्वास्थ लाभेल. नातेवाईकांचा विरोध संभवतो. लहान-सहान कुरबुरी राहतील. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - तूळ:-
दूरच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांचे प्रश्न सोडवावे लागतील. ग्रंथ वाचन कराल. यात्रा कंपनीची सवलत मिळेल. बोलतांना सारासार विचार करावा. - वृश्चिक:-
रागावर नियंत्रण ठेवावे. औद्योगिक वाढीचा विचार करावा. कौटुंबिक कार्यक्रम होतील. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. - धनु:-
तुमच्यातील आशावाद वाढेल. सामाजिक दर्जा सुधारता येईल. शैक्षणिक कामात प्रगती करता येईल. ऐहिक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. - मकर:-
मनातून नैराश्य दूर सारावे. कामाची धांदल राहील. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. कमिशनच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. - कुंभ:-
फार हट्टीपणा करू नका. आपले विचार उत्तम प्रकारे मांडावेत. कामात तत्परता दाखवाल. अतिचिकित्सा करणे टाळावे. मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. - मीन:-
कल्पनाशक्तीला चांगली भरारी मिळेल. घरी मोठ्या लोकांचा वावर राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील कामात व्यग्र राहाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 07-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 07 february 2020 aau