scorecardresearch

Premium

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०४ डिसेंबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ भानवै नमः या मंत्राचा जप करावा. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

मारूतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत अ‍सताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –पांढरा

कर्क

मारूती मंदिरामध्ये अन्नदान करावे. कुटूंबाशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –पिवळा

सिंह

गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावेत. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ गॅ गणपते नमः या मंत्राचा जप करावा. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग –लाल

तुळ

गणपती मंदिरामध्ये लाल फुल अर्पण करावे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग -पांढरा

वृश्चिक

कुलदैवतेचे पूजन व स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीची खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता घ्यावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग –आकाशी

धनु

गणपती अथर्व शीर्ष म्हणून दिवसाची सुरूवात करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –नारंगी

मकर

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अ‍नुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

गुरूंचे आणि गणपतीचे स्मरण ठेवावे, कार्यात ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल.
आजचा रंग- राखाडी

मीन

ॐ र्‍हीं क्लीम श्री या बीज मंत्राचा 11 वेळा जप करून दिवसाची सुरूवात करावी. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 04 december

First published on: 04-12-2018 at 01:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×