- मेष:-
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. - वृषभ:-
कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. कमिशनमधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. - मिथुन:-
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल. - कर्क:-
मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल. - सिंह:-
जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. - कन्या:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला. - तूळ:-
हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. - वृश्चिक:-
बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका. - धनु:-
स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल. - मकर:-
सामुदायिक वादात अडकू नका. गैरसमजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात. - कुंभ:-
कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका. - मीन:-
काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडिलांचे मतविरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 25-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 25 february 2020 aau