Darsha Amavasya Vishesh Daily Horoscope 19 november 2025 : आज १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. आज आयुष्यमान योग जुळून येईल आणि स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ३ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४१ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज दर्श अमावास्या सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल. तर आज तुमच्या राशीवर दर्श अमावास्येचा कसा परिणाम होईल जाणून घेऊया…
दर्श अमावास्या विशेष पंचांग व राशिभविष्य, १९ नोव्हेंबर २०२५ (Darsha Amavasya Special Horoscope 19 November 2025 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
वादाचा मुद्दा पटवून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
