Dhanteras Horoscope: धनत्रयोदशीला ग्रहांचा अतिशय सुंदर आणि शुभ संयोग तयार झाला आहे. या धनत्रयोदशीला हंस राजयोग, बुधादित्य राजयोग आणि ब्रह्म योग असा अत्यंत मंगल योग बनला आहे. खरं तर गुरु ग्रहाचं गोचर त्याच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत होत आहे, ज्यामुळे हंस राजयोग तयार झाला आहे. त्याच वेळी बुध आणि सूर्य हे दोघेही कन्या राशीत एकत्र आल्यामुळे बुधादित्य राजयोग प्रभावशाली झाला आहे.

याच काळात ब्रह्म योगाचाही अत्यंत शुभ संयोग बनला आहे. या सर्व शुभ ग्रहयोगांमुळे या धनत्रयोदशीच्या दिवशी मिथुन, कर्क यांसारख्या पाच राशींना धनलाभ होईल, नव्या संधी मिळतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल. चला तर मग जाणून घेऊया की या धनत्रयोदशीला कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांच्या दुसऱ्या भावात हंस राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या धनत्रयोदशीच्या काळात मिथुन राशीच्या लोकांना मालमत्तेचा आनंद मिळू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या कौशल्याने सगळ्यांना प्रभावित कराल. हंस राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी देखील करू शकता. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरगुती जीवनातले सगळे मतभेद दूर होतील आणि घरात शांतता राहील. तसेच तुमची कलात्मक गोष्टींमध्ये आवड वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्यांचा अधिक चांगला विकास करू शकाल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीतच हंस राजयोग तयार होत आहे. या काळात शुभ ग्रह गुरु तुमच्या राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना वाहन किंवा मालमत्तेचा आनंद मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला पैसे कमावण्यासाठी चांगले संधीही मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरही येऊ शकते. तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. तुमच्या आर्थिक जीवनात स्थिरता राहील आणि परिस्थिती अनुकूल असेल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीतच बुधादित्य राजयोग तयार होत आहे. सूर्य आणि बुध युतीने कन्या राशीत एकत्र येणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या राशीच्या अकराव्या भावात गुरुचा गोचरही होईल. त्यामुळे तुमच्यासाठी दुहेरी लाभाचा योग तयार झाला आहे. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. तुम्ही या काळात एखादी मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच करिअरमध्ये तुम्हाला अनपेक्षित फायदा होण्याच्या शक्यता आहेत.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांवर गुरुची पाचवी दृष्टि राहणार आहे. त्यामुळे गुरुच्या कृपेने तुम्हाला भाग्याचा पूर्ण साथ मिळेल. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. या राशीतील अविवाहित लोकांसाठी लग्नाचे योग तयार होऊ शकतात. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना या काळात मोठा लाभ मिळू शकतो. एकूणच या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा आणि प्रगती मिळेल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांवर गुरुची सातवी दृष्टि राहणार आहे आणि दहाव्या भावात सूर्यही असतील. त्यामुळे गुरु आणि सूर्याच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांना नफा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. धनत्रयोदशीपूर्वी तुम्हाला मोठा बोनस किंवा इतर आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच कुटुंबातील सदस्य किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला एखादं मोठं गिफ्ट मिळू शकतं. या काळात तुम्हाला भाग्याचा पूर्ण साथ मिळेल. धनत्रयोदशीनंतर तुमच्यासाठी यश आणि समृद्धीचे दिवस सुरू होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)