Diwali Horoscope: वैदिक पंचांगानुसार या वर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबरला साजरा केला जाईल. या दिवशी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपल्या नीच राशी कन्येत जाईल. पण त्यातून नीचभंग राजयोग बनेल. यामुळे काही राशींचं नशीब उंचावू शकते. या काळात तुमच्या पैशात मोठी वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही या काळात कोणतेही वाहन, महागडे सामान किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. चला तर मग पाहूया, या लकी राशी कोणत्या आहेत…
मकर राशी (Capricorn Horoscope)
नीचभंग राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शुक्र ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत नवम भावावर जाणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या नशीबाची साथ राहील. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशाची सफर करू शकता.
धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनत आणि क्षमता कौतुकास पात्र ठरू शकते. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
तुमच्यासाठी नीचभंग राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून लग्न भावावर बनणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. लग्न झालेल्या लोकांचं वैवाहिक जीवन छान राहील. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात खूप वेळेपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मेहनत केल्यास यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. तसेच या काळात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
नीचभंग राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि नफा मिळण्याच्या ठिकाणी बनणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापारातही नफा मिळण्याची संधी आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. तसेच केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. विदेश यात्रा किंवा विदेशाशी संबंधित कामातही यश मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)