Diwali Rajyog: वैदिक ज्योतिषानुसार जेव्हा ग्रहांचे विशेष गोचर होतात, तेव्हा ते शुभ योग निर्माण करतात. या योगांचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर, समाजावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. या वर्षी दिवाळीच्या दिवशी असाच एक अतिशय शुभ योग तयार होत आहे तो योग म्हणजे नवपंचम राजयोग.
ज्योतिषीय गणनेनुसार, १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी शुक्र आणि अरुण (यूरेनस) हे ग्रह एकमेकांपासून १२० अंशांच्या कोनात असतील. या संयोगामुळे हा शुभ योग तयार होईल.
या वेळी अरुण ग्रह वृषभ राशीत आणि शुक्र कन्या राशीत असेल. हा संयोग अनेक राशींसाठी भाग्य आणि धनवृद्धीचे संकेत देत आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या राशींवर या राजयोगाचा सर्वात जास्त प्रभाव पडेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून चौथ्या भावात गोचर करणार आहेत, त्यामुळे कुटुंब आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. बऱ्याच काळापासून चालू असलेले कुटुंबातील वाद मिटतील आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ पदोन्नती आणि सन्मान मिळविण्याचा असेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खास लाभदायक ठरेल. हा योग तुमच्या राशीपासून धन आणि वाणी भावात तयार होत आहे, त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता जास्त आहे. करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात, प्रमोशनचे योग बनतील आणि व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल. या काळात तुमच्या शब्दांमध्ये असं आकर्षण असेल की लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप शुभ ठरू शकतो. या काळात शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून आठव्या भावात गोचर करतील, जो बदल आणि लाभ यांचा संकेत देतो. या योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. परदेश प्रवास, नवी नोकरी किंवा पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. उच्च पदांवर काम करणाऱ्यांना नेतृत्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा काळ वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठीही अनुकूल असेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)