Diwali and laxmi Pujan 2025 bhadra kaal: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी आणते. या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचांगानुसार, यंदा दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी केली जात असून २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. दिवाळीच्या दिवशी भद्राकाळ देखील असणार आहे. ही वेळ नक्की कोणती? हे आपण जाणून घेऊ
भद्राकाळ कधी?
पंचांगानुसार, २० ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी भद्राकाळ सकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल. परंतु या काळाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही. तसेच या दिवशीचा राहू काळ सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपासून ते ९ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भद्रा काळ, राहू काळ कधी?
उदय तिथीनुसार, लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल. हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी भद्राकाळ लागणार नाही. तसेच या दिवशीचा राहू काळ दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.
लक्ष्मीपूजन तारीख, तिथी
२० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी अमावास्या तिथी सुरू होणार असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार, लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल.
लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)