Budh Transit After Diwali 24 October: दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचं हे गोचर २४ ऑक्टोबर, शुक्रवार दुपारी १२:३९ वाजता होईल. बुध २३ नोव्हेंबर, रविवार संध्याकाळी ७:५८ वाजेपर्यंत वृश्चिक राशीत राहील. बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा ग्रह आहे. तो जेव्हा वृश्चिक राशीत प्रवेश करतो, तेव्हा सर्व राशींच्या जीवनात खोल बदल घडवतो.
वृश्चिक ही जलतत्त्वाची आणि स्थिर रास आहे, जी रहस्य, गूढता, अंतर्ज्ञान आणि बदल यांचे प्रतीक आहे. बुध या राशीत येऊन लोकांना रहस्य उलगडण्याची क्षमता, सखोल विचार आणि मानसिक ताकद वाढविण्यास मदत करेल.
या काळात प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम दिसून येईल. बोलणे आणि निर्णय घेणे विचारपूर्वक करावे लागेल. हा काळ विशेषतः संशोधन, ज्योतिष, गुप्त विद्याशास्त्र किंवा मानसशास्त्राशी संबंधित लोकांसाठी खूप चांगला ठरेल. बुधाचं हे गोचर ९ राशींच्या लोकांना श्रीमंत बनवू शकतो – त्यांच्या साठी मालमत्ता, नवी नोकरी आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत.
मेष: बुधाचं हे गोचर मेष राशीच्या अष्टम भावात होत आहे. या काळात रहस्य, संशोधन, गुंतवणूक आणि अध्यात्मिक विचारांमध्ये वाढ होईल. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे, पण वादविवाद टाळा. गुप्त शत्रूंपासून सावध राहा.
वृषभ: बुधाचं गोचर वृषभ राशीच्या सप्तम भावात होत आहे. पती-पत्नीमध्ये संवाद वाढेल, पण गैरसमज टाळावेत. व्यावसायिक भागीदारीत नवीन संधी मिळतील. जुने नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा योग्य काळ आहे.
कर्क: बुधाचं गोचर कर्क राशीच्या पंचम भावात होत आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, पण जास्त भावनात्मक होणे नुकसानकारक ठरू शकते. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. मुलांबद्दल जबाबदारी वाढेल.
कन्या: बुधाचं गोचर कन्या राशीच्या तिसऱ्या भावात होत आहे. या काळात धैर्य आणि संवाद कौशल्य वाढेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. लेखन, माध्यम, संवाद किंवा प्रवासातून फायदा मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठीही हा चांगला काळ आहे.
तूळ: बुधाचं गोचर तूळ राशीच्या दुसऱ्या भावात होत आहे. या काळात आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित राहील. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. बोलण्यात गोडवा ठेवा, नाहीतर नातेसंबंधात तणाव येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक: बुधाचं गोचर वृश्चिक राशीतच होत आहे. हा काळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्वतःची मते स्पष्ट सांगण्यासाठी आणि नवीन संधी स्वीकारण्यासाठी योग्य आहे. बोलताना विचारपूर्वक बोला आणि संयम ठेवा- ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैयक्तिक निर्णय घाईत घेऊ नका.
मकर: बुधाचं गोचर मकर राशीच्या अकराव्या भावात होत आहे. या काळात मित्रांकडून फायदा आणि प्रगती होईल. तुमचा सामाजिक गोतावळा वाढेल आणि नवीन संपर्कांमुळे लाभ होईल. तुमचे उद्दिष्ट आणि योजना पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे.
कुंभ: बुधाचं गोचर कुंभ राशीच्या दहाव्या भावात होत आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठ अधिकारी आणि बॉस यांच्यासोबतचे संबंध सुधारतील. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बोलणे आणि संवादातून लाभ मिळेल.
मीन: बुधाचं गोचर मीन राशीच्या नवव्या भावात होत आहे. या काळात नशिब आणि उच्च शिक्षणावर चांगला परिणाम दिसेल. लांब प्रवासातून फायदा मिळेल. धर्म, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांत रस वाढेल. गुरुजन आणि वडिलांशी संबंध अधिक घट्ट होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)