How To Improve Fortune: शास्त्रानुसार, व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या बहुतांश अडथळ्यांना त्या व्यक्तीचे कर्म, प्रारब्ध, नशीब या सगळ्या गोष्टी असू शकतात; परंतु अनेकदा स्वत:बरोबर काहीतरी वाईट होतं तेव्हा लोक स्वतःच्या नशिबाला दोष देतात. आपल्या आयुष्यातील अडथळ्यांमागे किंवा अपयशामागे आपण लावून घेतलेल्या चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत असतात. पण, या सवयी नक्की कोणत्या? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या चुकीच्या सवयी तुमचे भाग्य कमजोर करतात
नखे कुरतडणे
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अनेकांना सतत नखे कुरतडण्याची वाईट सवय असते. नखे कुरतडल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत होतो, ज्यामुळे समाजात कधी मान-सन्मान मिळत नाही. त्याशिवाय तुमचे भाग्य कमजोर होते.
सकाळी उशिरा उठणे
सकाळी उशिरा उठणे फक्त भाग्यच नाही, तर तुमचे आरोग्यदेखील कमजोर करते. सकाळी उशिरा उठल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडू शकतो.
रात्री जागरण करणे
जे लोक रात्री उशिरापर्यंत विनाकारण जागरण करतात, अशा व्यक्तींचे नशीब कधीही त्यांची साथ देत नाही. जे लोक रात्री उशिरा ऑफिसचे काम किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करतात, कष्ट करतात. अशा व्यक्तींना हा दुप्षरिणाम भोगावा लागत नाही. परंतु, जे लोक विनाकारण मोबाईलमध्ये रात्री उशिरापर्यंत रील्स, चित्रपट पाहून आपला वेळ वाया घालवतात, त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो.
घर अस्वच्छ ठेवणे
देवी लक्ष्मीला अस्वच्छता अप्रिय आहे. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवावी. घर अस्वच्छ असल्यास, त्या घरातील व्यक्तींचे नशीब उजळण्यात अडथळे येतात,.
सकाळी उठल्यानंतर मोबाईल बघणे
अनेक जण सकाळी उठल्यानंतर सर्वांत आधी मोबाईल हातात घेतात. त्यामुळे सकाळचा महत्त्वाचा बराच वेळ वाया जातो. अशी चूक तुम्ही करू नका. सकाळी उठल्यानंतर योगा, मेडिटेशन, अंघोळ, नाश्ता हे सर्व नित्यक्रम आटोपल्यानंतरच मोबाईल हातात घ्या.
पाय घासून चालणे
अनेकांना जमिनीला पाय घासून चालण्याची वाईट सवय असते. ही सवय ताबडतोब बदला. कारण- या वाईट सवयीमुळे राहू ग्रह कमजोर होतो. त्याशिवाय यामुळे कौटुंबिक आयुष्यात भांडणे होतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
