पौष्टिक अन्न खाण्यासोबतच आहार योग्य ठिकाणी बसून योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. अन्न शिजवण्याचे ठिकाण किंवा पद्धत चुकीची असेल तर जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या चुकांमुळे धनहानी, आजारपण इत्यादी समस्या उद्भवतात. आज आपण वास्तुशास्त्राच्या त्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे पालन केल्याने माणसाचे आयुष्य दीर्घायुष्य होते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती, आरोग्य चांगले राहते. यामध्ये, जेवताना तुमची दिशा योग्य असणे फार महत्वाचे आहे.

  • वास्तुशास्त्रानुसार अन्न खाण्याची उत्तम दिशा पूर्व दिशा आहे. या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात. वय वाढते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण; मानले जातात अत्यंत भाग्यवान

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
  • ज्या लोकांना लवकर पैसे कमवायचे आहेत त्यांनी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे. धनाची देवता कुबेरची ही दिशा आहे. या बाजूला तोंड करून अन्न खाल्ल्याने माणूस श्रीमंत होतो. घरातील प्रमुखाने नेहमी या दिशेला तोंड करून अन्न खावे.
  • जे लोक नोकरी करतात किंवा परीक्षा-मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांनीही उत्तरेकडे तोंड करून अन्न खावे. यामुळे त्यांना यश मिळेल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना भरपूर धनप्राप्ती होईल.
  • तर पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने रोग दूर होतात. आरोग्य चांगले राहते. त्यामुळे जे लोक कोणत्याही आजाराचे रुग्ण आहेत त्यांनी रोज पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खावे, त्यांना लवकरच लाभ होईल.

‘या’ राशीच्या मुलांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडतात मुली; लग्न करण्यास असतात उत्सुक

  • चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून अन्न खाऊ नये. असे केल्याने अनेक आजार आपल्याला घेतात. घरात गरिबी येते. पैश्याची हानी होते. ही दिशा पितरांची दिशा आहे, त्यामुळे या दिशेला तोंड करून अन्न कधीही खाऊ नये.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)