Gajkesari Rajyog: लवकरच गुरु आणि चंद्र यांची युती होणार आहे, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. या युतीमुळे अतिशय शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. चला तर मग पाहूया, या राजयोगाचा फायदा कोणत्या ३ राशींना होणार आहे.
१२ ऑक्टोबर रोजी पहाटे ०२:२४ वाजता चंद्र आपल्या राशीचा बदल करून वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या मिथुन राशीतच देवगुरु गोचर करत आहेत. त्यामुळे मिथुन राशीत गुरु-चंद्र युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होत आहे.
या योगाच्या प्रभावामुळे ३ राशींच्या जातकांना विशेष फायदा होईल आणि धन-संपत्तीमध्ये वाढ होईल. बुद्धी, ज्ञान आणि मानसिक शांतता मिळेल. चला जाणून घेऊया या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कोणते फायदे होणार आहेत.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
गजकेसरी राजयोगामुळे मिथुन राशीच्या जातकांना विशेष लाभ होणार आहे. पूर्वी केलेल्या कामाचे पूर्ण फळ मिळेल आणि संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जातक जे कोणतेही काम सुरू करतील ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत. मानसिक शांती मिळेल आणि जुन्या योजनांवर केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल आणि खांद्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या जातकांसाठी गजकेसरी राजयोग जीवनात नवे बदल घेऊन येईल. जातकांना भौतिक सुख मिळेल. मानसिक संतुलन पूर्वीपेक्षा चांगले राहील. या राशीचे लोक मोठे निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. जुने मित्र व्यवसायात मदत करू शकतात. उत्पन्न आणि नोकरीत यश मिळवण्याचे नवे मार्ग उघडतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी सरकारी कामे शुभ ठरू शकतात. गजकेसरी राजयोगाच्या प्रभावामुळे जातकांना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक अडचणी संपतील. कुटुंबासोबत, विशेषतः जीवनसाथीबरोबर चांगला वेळ घालवता येईल. कुटुंबासोबत लांब प्रवास होऊ शकतो. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो आणि लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)