Ganesh Chaturthi Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचं जीवन त्याच्या जन्मतारखेवर म्हणजेच मूलांकावर अवलंबून असतं. जसं ग्रह आणि राशी माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, तसंच मूलांकही व्यक्तीचा स्वभाव, स्वभावाची वैशिष्ट्यं आणि भाग्य यावर प्रभाव टाकतो.

अंकशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला काही खास मूलांक असलेल्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूलांक असलेल्या लोकांना बाप्पाचा आशीर्वाद मिळणार आहे.

मूलांक म्हणजे काय? (What is Mulank)

अंकशास्त्रानुसार मूलांक काढण्यासाठी जन्मतारखेतील अंकांची बेरीज केली जाते. जर एखाद्याचा जन्म १४ तारखेला झाला असेल तर १+ ४ = ५ होईल. म्हणजे त्याचा मूलांक ५ आहे.

मूलांक १ (Mulank 1)

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २९ तारखेला झाला आहे, ते लोक नेतृत्व करण्याची क्षमता असलेले असतात आणि जीवनात मोठ्या यशापर्यंत पोहोचतात. गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांच्या कामातील अडथळे आपोआप दूर होतात.

मूलांक ३ (Mulank 3)

ज्यांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे त्यांचा संबंध मूलांक ३ शी असतो. अशांना गणपती बाप्पाकडून विद्या, बुद्धी आणि भाग्याचं वरदान मिळतं. गणपतीची पूजा केल्याने त्यांच्या शिक्षणात, करिअरमध्ये आणि व्यवसायात खास प्रगती होते.

मूलांक ५ (Mulank 5)

ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, ते मूलांक ५ चे मानले जातात. बुद्धी आणि वाणीचे अधिपती गणपती बाप्पा अशा लोकांवर खास कृपा करतात. हे लोक आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावी बोलण्याने सगळ्यांना जिंकून घेतात. बाप्पाची पूजा केल्याने त्यांचं वैवाहिक आणि सामाजिक जीवन आनंदी राहतं.

मूलांक ९ (Mulank 9)

अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे, ते लोक मूलांक ९ चे मानले जातात. हे लोक धाडसी, पराक्रमी आणि जोशपूर्ण स्वभावाचे असतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात यश आणि धनाची कमतरता राहत नाही. गणपतीची उपासना केल्याने त्यांच्या रागावर आणि आवेगावर नियंत्रण राहते.